Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एड्स व क्षयरोगावर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एड्स व
क्षयरोगावर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
सांगली: येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सिव्हील हॉस्पिटल सांगली व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली गेली. युवकांमध्ये होणारे एच. आय. व्ही. चे  वाढते संक्रमण व एड्स टाळण्यासाठी असणाऱ्या प्रतिबंधक  उपाययोजनांची माहिती महाविद्यालयीन युवक-युवतींना व्हावी या प्राथमिक उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्याचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे नियोजन सांगली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे प्रकल्प अधिकारी श्री. प्रमोद संकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 


प्रथम क्रमांक बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, द्वितीय क्रमांक डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली व  तृतीय क्रमांक म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ यांना मिळाला. विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती भाविकट्टी यांच्या हस्ते झाले. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

स्वागत व प्रास्ताविक प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले. प्रा. डॉ. भरत बल्लाळ व प्रा. आरिफ मुलाणी यांनी स्पर्धा आयोजनात सहकार्य केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)