चाकाची खुर्ची…
चाकाची खुर्ची…
'चाकाची खुर्ची' नसीमा हुजरूक यांच्या आत्मकथनाची ओळख करून घेऊया.
नसीमा दीदी वयाच्या चौदा ते पंधरा वर्षांचे आयुष्य म्हणजे सळसळता उत्साह जमिनीवर पाय ठरत नसत आणि त्या नंतरचे आयुष्य म्हणजे चाकाची खुर्ची हे आत्मकथन. नसीमा दीदी अचानक पाठीच्या दुखण्याने अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होते.1966 मध्ये दोरीच्या उड्या मारता मारता अचानक पाठीतून जीवघेणी कळ येते आणि 1967 ला म्हणजे अवघ्या एका वर्षात छातीपासूनचा खालचा भाग कायमस्वरूपी निकामी होतो. या एक वर्षात अनंत यातना सहन केल्या.अनेक दवाखाने,डॉक्टर्स पण कशाचाच उपयोग झाला नाही. ऐन तारुण्यात वाट्याला आलेल्या दुःखाने दीदी पार कोलमडून गेल्या. पण घरच्यांनी आशा सोडली नव्हती. कुणी काय सांगतील ते उपाय सुरू होते. दीदींना मिळालेली घरच्यांची साथ शब्दातीत आहे.घरच्यांच्या शिवाय दीदीची शालेय मैत्रीण की जी दीदींची ही अवस्था झाल्यानंतरही ती आणि तिचे वडील दीदींना गाडीतून घेऊन फिरवून आणत. असंच एकदा त्यांनी बाबुकाकांची भेट घडवून आणली. ही भेट दीदींच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या भेटीमुळे आज असंख्य दिव्यांगांना स्वावलंबी व हक्काचे घर मिळवून देणाऱ्या दीदी ठरल्या आहेत. दीदींच्या एका प्रोजेक्टला भेट देण्याचा योग आला तो 2019 च्या सुजनयात्रेतून तो प्रोजेक्ट म्हणजे स्वप्ननगरी, जि. सिंधुदुर्ग. हे आहे अस्थिव्यंग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी निवासी केंद्र.इथे विविध प्रकारचे व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले जाते. काजू प्रकल्प, भात कांडप, शिलाई असे अनेक उपक्रम राबविले जातात या उपक्रमांची माहिती आम्हाला तिथे असणार्या दिव्यांग व्यक्तीनीच करून दिली.तेथील वस्तीगृहातील सुविधा,स्वच्छता, पाहूणचार पाहून आम्ही अंतर्मुख झालो. या सर्व प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणार्या जेष्ठ दीदी म्हणजेच या आत्मकथनाच्या नायिका. पण दीदी भेटल्या नाहीत म्हणून थोडी नाराजी पण तिथेच मला हे पुस्तक मिळाले.
परावलंबित्व असूनही सतत प्रवास. त्यात परदेशी दौरा दिल्ली,मुंबई, पुणे, नागपूर अशा सतत वाऱ्या अनेक ठिकाणी दिव्यांगांसाठी असणाऱ्या सेवासुविधा बघून त्याचा अभ्यास करून दीदीनी
दीदी काम करत राहिल्या.अनेक अनुभव वाट्याला आले. अनेकांचे आयुष्य उभं केलं,करत आहे. अनेक चांगले लोक भेटले,देणगीदार भेटले,डॉक्टर्स भेटले आणि सर्वांच्या सहकार्याने कार्याचा पसारा वाढत गेला.
पुस्तक वाचत असताना आणि वाचून पूर्ण केल्यानंतर विध्यात्याने आम्हाला धडधाकट शरीर दिले आहे तरी आम्ही अगदी छोट्या मोठ्या कारणावरून स्वतःला किंवा नशिबाला दोष देत बसतो. अधिक क्षुल्लक कारणावरून तरुणाई आपला आयुष्य संपत आहे.तर काही स्वतःच जगण्यात मशगुल आहेत.अशा सर्वांना सांगावसं वाटतं वर्षातील काही दिवस इतरांसाठी जगा जगून बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातला आनंद नक्कीच मिळेल.
वाचनाने एक नवा दृष्टीकोन मिळतो.
Post a Comment