Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅमचा उद्घाटन समारंभ संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅमचा उद्घाटन समारंभ संपन्न


सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रॅमचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भारती विद्याापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मांडला. तसेच विद्यार्थ्यांना संस्था आणि महाविद्यालयाची प्रगती कशी होत गेली याबद्दल थोडक्यात आढावा घेतला. महाविद्यालयात कोणकोणते कोर्सेस सुरू आहेत त्याचबरोबर शासनाकडून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिष्यवृत्त्या मिळतात याचीही माहिती त्यांनी दिली.


पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविद्यालयात सर्व सुविधांयुक्त असे ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, एन.एस. एस. विभाग आहेत, त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि समाजामध्ये वावरत असताना नम्रता आणि आदर बाळगला पाहिजे, तसेच नियम आणि शिस्त यांचे पालन केले पाहिजे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
   
या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नॅक समन्वयक डॉ. ए. आर. सुपले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. अमोल कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सौ. जे. डी. हाटकर, डॉ. अनिकेत जाधव, प्रा. अमर तुपे, डॉ. सौ. एस. वाय. साळुंखे, प्रा. सतीश कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व प्रथम वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)