राज्यस्तरीय साय स्टार संशोधन स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश
राज्यस्तरीय साय स्टार संशोधन स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश
सांगली : संजय घोडावत विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'साय स्टार' विज्ञान संशोधन स्पर्धेत येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाच्या कु. अनिकेत कोडग व कु. केतन सबकाळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मूलभूत विज्ञान विभागात या विद्यार्थ्यांनी ‘ग्राईंडस्टोन केमिस्ट्री फॉर सस्तनेबल ऑरगॅनिक सिन्थेसिस’ या विषयावर सादरीकरण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे प्रोत्साहन व
केमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. टी. आर. लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अनिकेत
कोडग व कु. केतन सबकाळे यांनी हे यश
प्राप्त केले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते यशस्वी
विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यश प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. बोऱ्हाडे व डॉ. ए. आर. सुपले यांच्यासहित सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment