डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. योगासनांचे महत्त्व सांगताना डॉ. कणसे म्हणाले की, प्राचीन काळापासून भारतामध्ये योगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. योग केल्याने मन, बुद्धी आणि शरीराला उर्जा मिळते, मानसिक दृष्ट्या शरीर सुदृढ बनते. त्यामुळे आपण दिवसभर प्रसन्न राहतो. केवळ योग दिनाच्या दिवशी योग न करता वर्षभर रोज योगासनांचा व प्राणायामाचा सराव करणे गरजेचे आहे.
या वेळी सांगलीवाडीचे नगरसेवक मा. अंजिक्य पाटील उपस्थित होते. योगशिक्षक म्हणून डॉ. रूपाली कांबळे व प्रा. अमर तुपे यांनी सर्व प्राध्यापकांकडून योगासन प्रात्याक्षिक करून घेतले. या प्रसंगी एन.एस.एस. विभागातर्फे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन एन.एस.एस विभाग व एन.सी.सी. विभागातर्फे करण्यात आले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment