Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पर्यावरणपूरक राखी प्रदर्शनाचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पर्यावरणपूरक राखी प्रदर्शनाचे आयोजन  


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात  पर्यावरणपूरक राखी प्रदर्शनचे आयोजन करणेत आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस .व्ही.पोरे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्र.प्राचार्यांना विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या राखी बांधून विद्यार्थिनीने औक्षण केले. यावेळी डॉ. पोरे म्हणाले की,रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाची विन एका धाग्याने बांधलेली असते. तो धागा म्हणजेच काळजी असणाऱ्या बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. तसेच  झाड ,पाला व तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा राख्यांची निर्मिती करता येते, असे विद्यार्थिनींनी या  प्रदर्शनात दाखवून दिले. आज च्या काळामध्ये विद्यार्थ्याने अशाच प्रकारच्या राख्यांची निर्मिती करून हा सण साजरा करावा.
     
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालातील विद्यार्थिनीनी एनडीआरएफ प्रमुख महेंद्रसिंह पुनिया व एनडीआरएफ चे सर्व जवानांना पर्यावरणपूरक राख्या बांधल्या. तसेच उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए. एल.जाधव यांनाही पर्यावरणपूरक राख्या  बांधल्या.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन प्रा.सौ.वासंती गावडे यांनी केले. तर आभार प्रा.आर.एस.काटकर यांनी केले या राखी प्रदर्शन कार्यक्रमास प्रा.एस.डी पाकले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)