Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचा रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचा रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम 


(सावली बेघर निवारा केंद्र व कै.दादू काका भिडे बालसुधारगृहामध्ये  कार्यक्रमाचे आयोजन)
सांगली: डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे  यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सावली निवारा केंद्र सांगली येथील बेघर, निराधार लोकांच्यासाठी  रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी विद्यार्थिनीनी त्यांना राख्या बांधल्या. तसेच अल्पोहार देण्यात आला. आणखीन  एक आगळावेगळा उपक्रम राबविला तो म्हणजे रक्षाबंधनाच्या औचित्य साधून कै. दादू काका भिडे बालसुधारगृह सांगली येथील एक पालकत्व असणाऱ्या मुलांना महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राखी बांधून औक्षण केले आणि त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी  वसतिगृहातील अधीक्षक मिलिंद कुलकर्णी व  निरीक्षक विजय माळी हे उपस्थित होते. 
    
याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अरुण जाधव, एन.एन.एस.विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, प्रा. एस. डी. पाकले तसेच प्रा. आर. एस. काटकर, प्रा.अमोल कुंभार, डॉ. दादा नाडे, डॉ.मारुती धनवडे, डॉ. वर्षा कुंभार, प्रा.नलेश बहिरम प्रा.रोहिणी वाघमारे, प्रा.सौ. वासंती गावडे, सौ.अरुणा     सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील  विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.



(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)