Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यशाळा संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार १८ वर्षे याची पूर्ण झालेल्या व १८ वर्षे खालील वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणी विषयी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते व कार्यक्रमाधिकारी म्हणून मा.सतीश कांबळे उपस्थित होते .या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी  'देशाचा सुविद्य नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य' याविषयी सर्व विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. आपल्या देशाला आदर्श नागरिक महाविद्यालयातून  मिळावा, या विषयी प्र. प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. 
        
या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए. एल.जाधव, सौ.घोलप मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत  व प्रास्ताविक एन.एस.एस.चे विभागप्रमुख डॉ. विकास आवळे यांनी केले. तर आभार व्यावसायिक शिक्षण विभागाच्या प्रा. सौ. वासंती गावडे यांनी केले. यावेळी  महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)