Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे हाताळणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे हाताळणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे हाताळणे प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ गुरुवार, दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी उत्साहात सुरू झाला. 'इक्विपट्रॉनिक्स' या कंपनीचे मुख्य सल्लागार मा. श्री. मुस्तफा बादशाह व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळेसाठी 'इक्विपट्रॉनिक्स' कंपनीच्या सौजन्याने सर्व अत्याधुनिक उपकरणे या कार्यशाळेसाठी उपलब्ध केली आहेत.

या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील पदव्युतर विभागातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच शनिवारी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी विविध महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणी शास्त्र विभागातील १०० हून अधिक प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनीही नावनोंदणी करून आपला सहभाग नोंदवलेला आहे.
 
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक मा.डॉ. एच. एम. कदम अध्यक्षपद भूषवणार आहेत. 'इक्विपट्रॉनिक्स' कंपनीचे मुख्य सल्लागार मा. श्री. मुस्तफा बादशाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे उपस्थित राहणार आहेत. या प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे हाताळणे याबाबतचे मार्गदर्शन होणार आहे. कंपनीच्या सौजन्याने सहभागी शिक्षकांना कॅटलॉग चार्ट व आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे.
       
या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दादा नाडे, डॉ.मारुती धनवडे, प्रा.हर्षल वांगीकर, डॉ. आर. एन. देशमुख, डॉ. तृषांत लोहार, प्रा.नलेश बहिरम यांनी केले आहे. या कार्यशाळेमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण विविधांगाने दिवसभर सादर होणार आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)