Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी पॅरिसमधील ऑलिंपिक स्पर्धेत मारणार उंच उडी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी पॅरिसमधील ऑलिंपिक स्पर्धेत मारणार उंच उडी

सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. सर्वेश कुशारे हा पॅरिस मध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत आज दि. ७ ऑगस्ट रोजी उंच उडी या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. 

महाविद्यालयात शिकत असताना सर्वेशने महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर अनेक स्पर्धा खेळून यशस्वी कामगिरी केली होती. एशियन नॅशनल गेम, सिव्हिल सर्व्हिस स्पर्धा, इंटरनॅशनल स्पर्धा अश्या अनेक स्पर्धेत त्याचा सहभाग होता. तसेच केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याची निवड झाली होती. पुढे तो सैन्यात भरती झाला, तेथेही त्यांने आपल्या अंगी रुजविलेल्या खेळाची छाप सोडली नाही. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल सन २०२३ मध्ये ॲथलेटिक या खेळ प्रकारासाठी महाराष्ट्र शासनाने त्याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविले होते. त्याच्या कामगिरीचा उच्चांक पाहून ॲथलेटिक्समध्ये त्याला भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मिळत आहे हे निश्चितच आंम्हा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय पोरे यांनी यावेळी दिली. सर्वेश आज‌ दुपारी १२.३० वाजता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. 

त्याने ऑलिंपिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, महाविद्यालय विकास समिती व भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणेचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रुपाली कांबळे, प्राध्यापक व आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)