Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान



सांगली:  भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाने सांगली शहरातील विष्णू घाटावर स्वच्छता अभियान राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अनंत चतुर्दशी निमित्त या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य पडले होते. त्यांचे संकलन करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. संजय पोरे, एन.सी. सी. विभाग प्रमुख  डॉ. महेश कोल्हाळ, ज्येष्ठ प्राध्यापक संजय ठिगळे, डॉ. नितीन गायकवाड, प्रा. अमर तुपे, प्रा. विनायक पवार, प्रा. ओंकार चव्हाण उपस्थित होते.
    

विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना डॉ. पोरे म्हणाले की, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर आपले मन प्रसन्न राहते त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा आपले शरीर, मन आणि विचार स्वच्छ असेल तेव्हा चांगल्या चारित्र्याचा जन्म होतो. मुळात परिसर स्वच्छ करण्यापेक्षा तो अस्वच्छ होणारच नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      
एन. सी. सी. चे समन्वयक डॉ. कोल्हाळ यांनी घन कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे, अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभियानात महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागाचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)