Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात डी. एम. जे. टी परीक्षा संपन्न

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात डी. एम. जे. टी परीक्षा संपन्न


सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील इ.११ वी व इ.१२ वी (कला, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन संस्था (International Institute of Business Management) चिंचवड, पुणे यांच्या अंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा सामाजिक, बौद्धिक, शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचा सर्वे या परीक्षेतून घेण्यात आला. या परीक्षेच्या माध्यमातून सध्याच्या विद्यार्थ्यांचा कल आणि बुद्धिमत्ता यांचे परीक्षण या चाचणीतून करण्यात आले. विद्यार्थ्यांना नेमके कशात करिअर करावयाचे आहे, याची माहिती या सर्वेक्षणातून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे अचूक निरसन होईल अशी सर्वांना अशा वाटते.
    
ही परीक्षा बहुपर्यायी (Objective) स्वरूपाची होती. परीक्षेचे समन्वयक म्हणून कु. वसुधा हाके, अमीर शेख व मधुमती दुबे होते. या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील शिक्षकांनी काम पाहिले. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे व कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए . एल.जाधव यांचे या परीक्षेच्या नियोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)