Header Ads

Loknyay Marathi

गांधी विचार संस्कार परीक्षेत गणेश मदने सांगली जिल्ह्यात तृतीय

गांधी विचार संस्कार परीक्षेत गणेश मदने सांगली जिल्ह्यात तृतीय


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी गणेश विठ्ठल मदने याने गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची आणि कार्याची महती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने गेले अनेक वर्षे ही संस्था विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेत असते. या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत गणेशने सांगली जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्या बद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे यांनी पदक आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेसाठी गणेशसह सहभागी विद्यार्थ्यांना प्रा.शंकरराव पाकले यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव, प्रा. वासंती गावडे, प्रा. डी. व्ही. सूर्यवंशी, प्रा. रवींद्र काटकर, प्रा. एस.व्ही साळुंखे, प्रा. किशोर चौगुले, प्रा. एस. व्ही. जाधव, प्रा. के. पी. केंगार  सर्व यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)