Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील डॉ. वर्षा कुंभार यांचे पाठ्यपुस्तक प्रकाशित पाठ्यपुस्तक प्रकाशित

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील डॉ. वर्षा कुंभार यांचे पाठ्यपुस्तक प्रकाशित



सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांच्या 'ॲनिमल डायव्हर्सिटी' या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. कुंभार यांनी बी. एस्सी‌. भाग -१ या वर्गासाठी हे पुस्तक लिहिले आहे.  यावेळी प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ.सागर. देळेकर, डॉ.एस.एम.गायकवाड, डॉ.अर्जुन पन्हाळे, डॉ.भारती वाली इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
       
डॉ. वर्षा कुंभार यांच्या  पाठ्यपुस्तकाची निर्मिती अतिशय दर्जेदार झाली असून या पुस्तकाचे अध्ययन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी करावा, या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल असे प्रतिपादन डॉ. शिर्के यांनी केले.
        
डॉ. कुंभार यांच्या लेखनाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम,  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय समिती अध्यक्षा मा.विजयमाला कदम तथा वहिनी साहेब,भारती विद्यापीठ अभिमत मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, आदरणीय मोहनशेठ कदम, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह माननीय डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे,  भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले आदींनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)