डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामध्ये अद्यावत उपकरणाचे पूजन
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामध्ये अद्यावत उपकरणाचे पूजन
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयांमध्ये प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाच्या Diamond Jubilee Research Initiation या योजनेमधून "Comparative Studies on the Impact of Chawki Rearing on Cocoon Production in Tasar Silkworms" हा प्रकल्प मिळालेला आहे. हे अद्यावत उपकरण या प्रकल्पांतर्गत घेतलेले आहे. तसेच डॉ. वर्षा कुंभार यांना या अद्ययावत उपकरणासाठी इंडियन आणि ऑस्ट्रेलियन पेटंट मिळालेले आहे. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे यांच्या शुभहस्ते या अद्यावत उपकरणाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अद्यावत उपकरणाचा वापर हा वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी करावा. जेणेकरून नवीन संशोधनांमध्ये मोलाची भर पडेल. त्यामुळे होणारे संशोधन हे वास्तववादी होईल.
यावेळी प्र.प्राचार्य डॉ.पोरे यांनी प्रकल्पामधून मिळालेल्या या अद्यावत उपकरणाचे विशेष कौतुक केले. व पुढील कार्यासाठी डॉ. कुंभार यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, प्रा.कु.भारती भाविकट्टी, डॉ. विकास आवळे, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. अंकुश सरगर, प्रा.नलेश बहिरम, प्रा.सौ रुपाली माने, प्रा. कु. प्रियांका जाधव यावेळी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment