Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव येथील मा. डॉ. ए. डी‌. जाधव, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.एल.एल.जाधव व कार्यक्रमाचे समन्वयक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुंभार उपस्थित होते.
   


'Wild (Vanya Silk) Production, Conservation and Rural Livelihood' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. ए. डी. जाधव म्हणाले की,‌‌ भारतात विविध प्रकारच्या नैसर्गिक रेशीमांचे उत्पादन केले जाते. वन्य रेशीम उत्पादन आणि संवर्धन हे ग्रामीण उपजीविकेसाठी महत्त्वाचे आहेत.रेशीम उत्पादन प्रक्रियेत स्थानिक कुटुंबे सहभागी होत असल्याने त्यांना रोजगार मिळतो आणि त्यांच्या उपजीविकेचा स्तर उंचावतो. संवर्धनाच्या उपाययोजनांनी रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण प्रदान केले जाते, यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी आणि सामाजिक विकास साधता येतो असे प्रतिपादन केले. 

     
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, वन्यजीव आणि वन्य प्राण्यांचे जतन व संवर्धन हे आपल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. वन्यजीवांचे जतन केल्याने जैवविविधतेचे संरक्षण होते. शिकार, आणि औद्योगिक विकास यामुळे अनेक प्रजाती संकटात आल्या आहेत. त्यामुळे शासकीय धोरणे, संरक्षण आराखडे, आणि जागरूकता मोहीमांच्या माध्यमातून यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे क्रियाशील उपक्रम करणे गरजेचे आहे.
 
  
या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्यान व पोस्टर, रांगोळी, प्रश्नमंजुषा व घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये एकूण ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:
*पोस्टर स्पर्धा:
१. सानिया इरफान मुल्ला (प्रथम) बी.एस्सी - २
२. सानिया बाबू सय्यद (द्वितीय) बी.एस्सी - १
३. निकिता संतोष सूर्यवंशी (तृतीय) बी.एस्सी - १
४. मुस्कान अब्दुलसत्तार खातीब (उत्तेजनार्थ)बी.एस्सी-१ 
*रांगोळी स्पर्धा:
१. ज्योती प्रल्हाद हजारे (प्रथम) बी.एस्सी - २
२. अश्विनी सतीश यादव (द्वितीय) बी.एस्सी - २
३. अनुराधा संजय केंगार (तृतीय) बी.एस्सी - ३
४. परवेज जावेद मानेखान (उत्तेजनार्थ) बी.एस्सी - २
*प्रश्नमंजुषा स्पर्धा:
 १.नेहा संजय पोतदार (प्रथम) बी.एस्सी - ३
२. रोहित कोंडीबा म्हारुगडे (द्वितीय) बी.एस्सी - २
३. प्रथमेश प्रकाश माने (तृतीय) बी.एस्सी - २
४. दिपाली धनपाल भंडारे (उत्तेजनार्थ) बी.एस्सी - २
*घोषवाक्य स्पर्धा:
१. सादिया रियाज जमादार (प्रथम) बी.एस्सी - ३
२. मुहम्मदफैज मुहम्मदरफिक पेंढारी (द्वितीय) बी.एस्सी - २
३. सुहाना शरीफहुसैन मुजावर (तृतीय) बी.एस्सी - ३
४. दिव्या शहाजी गवळी (उत्तेजनार्थ) बी.एस्सी - २ 
 याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ. पोरे यांच्या हस्ते स्पर्धक विजेता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
        
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. आभार प्रा.नलेश बहिरम यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले. तर परीक्षक म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु.भारती भावीकट्टी, प्रा. अमोल कुंभार, डॉ.कृष्णा भवारी, डॉ.तृषांत लोहार यांनी काम पाहिले. 
              
यावेळी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. कु. प्रियांका जाधव, प्रा. सौ. रुपाली माने यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)