Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एकदिवसीय सेट/ नेट मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एकदिवसीय सेट/ नेट मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एकदिवसीय सेट/ नेट मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेकरिता कु. सपना वेल्हाळ व कु. प्रिया पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन्हीही मार्गदर्शक यशस्वी  माजी विद्यार्थीनी असुन, सध्या त्या आपल्याच महाविद्यालयातून संशोधनाचे कार्य करित आहेत. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या गौरवात आणखीनच वाढ झाली. याचे औचित्य साधून महाविदयालयाच्या वतीने व प्र. प्राचार्य डॉ. एस्. व्ही. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार समारंभ व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य  डॉ. एस्. व्ही. पोरे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पोरे म्हणाले की, वरिष्ठ  महाविद्यालयातील भरतीप्रणालीमध्ये सेट/ नेट किती महत्वाचे आहे ते पटवून दिले. त्याकरिता  लागणाऱ्या  सर्व संदर्भ ग्रंथांची उपलब्धता महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुरेपूर करून घ्यावा, असे आवाहन केले. तसेच भविष्यात नियमित भरतीकरिता सेट/ नेट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आगामी काळात वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक भरती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्याकरिता  विद्यार्थ्यांनी या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पदासाठी पात्र व्हावे, असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत कु. प्रिया पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, परीक्षेचे स्वरुप, एकूण विचारले जाणारे प्रश्न, आवश्यक संदर्भ ग्रंथ, पेपर- १ ची तयारी याचे सखोल माहिती दिली. याचबरोबर जुने प्रश्न संच उपलब्ध करून त्याच्या उजळणीवर भर देणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. द्वितीय सत्रातील मार्गदर्शनात कु. सपना वेल्हाळ यांनी पेपर -२ चा अभ्यास कसा करावा? विविध क्ल्रृप्त्या याचे विश्लेषण केले. याचबरोबर त्यांनी सोशल मिडीयामधील ॲानलाइन माध्यम - गुगल व यु ट्युब चा वापर अभ्यासाकरिता कसा करता येइल याची सखोल माहिती दिली. 


याप्रसंगी  कार्यशाळेच्या समन्वयक सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी सेट/ नेट परीक्षा म्हणजे काय? त्याची व्याप्ती, त्या परीक्षेकरिताची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याची इतंभूत माहिती आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. सम्रुद्धी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अरीफ मुलाणी व आभार प्रा.मतीन पटेल यांनी मानले. कार्यक्रमाकरिता कु. वैष्णवी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राद्यापक तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील बी. एस्. सी. भाग-३, एम्. एस्सी. भाग १ व २ मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)