Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत भित्तीपत्रिकेचे व पोस्टरचे अनावरण

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत भित्तीपत्रिकेचे व पोस्टरचे अनावरण


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लोकशाही, निवडणूका, मतदार याचे महत्त्व लक्षात घेता 'चला लोकशाही जाणून घेऊया' शीर्षकाखाली भित्तिपत्रक व पोस्टरचे अनावरण महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर 'सारथी' राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
       
यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. संजय ठिगळे उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणारे महाविद्यालयातील तरुण मतदार यांच्यामध्ये जाणीव व जागृती निर्माण करण्याच्या हेतूने राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते यांनी मतदाराच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.  
 
    

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की,भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही कायद्याच्या राज्यावर अवलंबून आहे. कायद्याचे राज्य हे भारतीय लोकशाहीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून राज्यकारभार केला जातो. राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी निवडणुका लोकांना निवड व न्याय संधी मिळवून देते. प्रत्येक भारतीय नागरिकांनी जागरूक व डोळसपणे मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून भारतीय लोकशाही सुदृढ होण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन केले.
 
यावेळी राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी गणेश साळुंखे, निशा माने, साक्षी आयवळे, सानिया कांबळे, प्रियांका पाटील, गणेश चंदनशिवे, रेणू केवट, प्रताप कारंडे, पूनम सरगर या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भित्तीपत्रक व पोस्टर सादर केले.
    
कार्यक्रमाचे आभार प्रा. उषादेवी कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)