Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अमर तुपे व नरेश पवार यांना पीएच. डी.

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अमर तुपे व नरेश पवार यांना पीएच. डी.


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक  अमर अनिल तुपे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून शारीरिक शिक्षण विषयातून पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. त्यांनी 'क्रॉस फिट प्रशिक्षण पद्धतीचा महाराष्ट्रातील १७ वर्षे वयोगटातील बेसबॉल खेळाडूंवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास' या विषयावर प्रबंध सादर केला होता. याकामी त्यांना प्रा. डॉ. गोविंद कलवले यांचे मार्गदर्शन लाभले.
    
तसेच इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक नरेश देवीदास पवार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून इंग्रजी विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. त्यांनी 'The Problems of Tribal Students in Learning English as a Second Language in Nandurbar District: A Case Study' या विषयावर प्रबंध सादर केला. याकामी त्यांना प्रा. डॉ. उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
           
भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम,  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय समितीच्या अध्यक्षा मा.विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, आदरणीय मोहनशेठ कदम, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह माननीय डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, भारती विद्यापीठ अभिमत मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, डॉ. डी. जी. कणसे तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले आदींनी दोघांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व क्रीडाक्षेत्रातील सहका-यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल शैक्षणिक विश्वात या दोघांचे कौतुक होत आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)