डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड
सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील बी. कॉम. भाग- २ चा विद्यार्थी अजिंक्य शिंदे याची एन.सी.सी. विभागातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल १६ महाराष्ट्र बटालियन सांगली तर्फे केरळ येथे होणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत -II' (EBSB) या दहा दिवसीय राष्ट्रीय कॅम्प साठी निवड झाली आहे. राष्ट्रीय कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल त्याने विशेष आनंद व्यक्त केला. या यशाचे संपूर्ण श्रेय त्याने आपण केलेल्या परिश्रमाबरोबर आपले आईवडील व महाविद्यालयाला दिले.
अजिंक्य च्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. संजय पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. या वेळी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना डॉ. पोरे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम केले तर कोणतेही असाध्य काम साध्य होऊ शकते. या वेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनीही त्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. सदर विद्यार्थ्यास एन.सी.सी. विभागाचे प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी ज्युनिअर विभागाचे प्रमुख प्रा. अरुण जाधव व एन. सी. सी. समिती मधील सदस्य प्रा. डॉ. अमर तुपे, प्रा. डॉ. रूपाली कांबळे, प्रा. मंगेश गावित यांच्यासह महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment