डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश-
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश-
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील इ.१२ वी विज्ञान विभागात शिक्षण घेत असलेले शुभम माळी याने थालीफेक या क्रिडा प्रकारात दुसरा क्रमांक तर महेश खोत याने ८०० मीटर रनिंग स्पर्धेत सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. सदर जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा या म.न.पा. आयोजित १९ व्या वर्षे वयोगटाखालील होत्या.जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.
या यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थांचे अभिनंदन केले व रत्नागिरी मध्ये होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, प्रा.आर. एस. काटकर, प्रा. पी.एन.देसाई, डॉ. नितीन गायकवाड, डॉ.रुपाली कांबळे, प्रा.एस. डी. पाकले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विषयाचे प्रा. विनायक पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment