Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा



सांगली :
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए .एल.जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, राज्यशास्त्र प्रमुख विभाग डॉ.वंदना सातपुते इ. मान्यवर उपस्थित होते.
  
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे म्हणाले की, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला घडवतील तसेच देशाला जर भारतीय राज्यघटना नसती, तर देश गुलाम झाला असता त्यामुळे प्रत्येकाने संविधानच आपला धर्म आहे असे म्हटले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अंमलात आणल्यामुळे समाजामध्ये समानता निर्माण झाली आहे, त्यामुळे भारत देश हा सार्वभौमत्व राहतो. सामाजिक समतेसाठी विषमते विरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठी अन्याय विरुद्ध बंड करणारे संघर्ष योद्धा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समजून घेतले पाहिजे. असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे वेळी डॉ .नितीन गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा उलगडा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. 
       
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन डॉ. वंदना सातपुते यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. जयश्री हाटकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)