Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थिनीसाठी कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कराटे प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"' या उक्तीप्रमाणे जर आपले आरोग्य चांगलं असेल तर मन ही प्रसन्न राहते आणि चांगले आरोग्यासाठी कराटे सारखे प्रशिक्षण विद्यार्थिनी साठी सुरू करणे आवश्यक आहे व त्याची सुरुवात आजपासून आपल्या महाविद्यालयात होत आहे. आधुनिक युगात आजच्या मुलीने स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे, तरच त्यांना स्वतःचे आत्मसंरक्षण करता येईल आणि समाजात स्वाभिमानाने जीवन जगता येईल. यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे. असे प्रतिपादन केले.
      
यावेळी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शिका म्हणून कु. भाग्यश्री बेळगावे हिने काम पाहिले.     
         
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए.एल. जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.एस.डी. पाकले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.नितीन गायकवाड, प्रा.आर. एस. काटकर, प्रा. किशोर चौगुले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)