डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'समाज प्रबोधन सप्ताह' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आ.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह' साजरा करण्यात आला. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'डिजिटल साक्षरता' या विषयावर व्याख्यान सांगली जिल्ह्यातील मु .पो. अंकलखोप ता. पलूस या ठिकाणी घेण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, अंकलखोप काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. घन:श्याम (मामा) सूर्यवंशी, सरपंच श्रीमती. राजेश्वरी सावंत, उपसरपंच श्री. कृष्णा हजारे, कार्यक्रम समन्वयक व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. आत्माराम पोळ, डॉ. महेशकुमार साळुंखे, प्रा. बाबासाहेब कुराडे, श्री. दत्तात्रय मोहिते व शिक्षकेतर सेवक इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे म्हणाले की, समाजातील सर्वच घटकांनी डिजिटल साक्षर असणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या घरी डिजिटल माध्यम म्हणून मोबाईलचा वापर केला जातो. मुलं-मुली सुद्धा मोबाईलचा वापर करत असताना सोशल मीडियावरून अमिष व प्रलोभन दाखवणाऱ्या वेबसाईटचा वापर करून अमिषाला बळी पडू शकतात. नंतर आई-वडिलांना माहित पडते. त्यानंतर आपली बदनामी होऊ शकते. त्यामुळे युवा वर्गासह सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
यानंतर अर्थशास्त्र विभागाचे डॉ. महेशकुमार साळुंखे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर आहोत ही संकल्पना आधुनिक काळात बदललेली आहे. आता खऱ्या अर्थाने डिजिटल साक्षर असणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून नवीन माहिती मिळवणे आणि वापरणे, माहिती तयार करणे आणि आपले संवाद कौशल्य सुधारणे इत्यादी घटकांमध्ये आपण सुधारणा करू शकतो. तसेच डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून आपण कौशल्यभिमुख माहिती आणि व्हिडिओ तयार करून पैसे मिळवू शकतो. डिजिटल साक्षरतेच्या जनजागृतीसाठी सरकारने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान आणि प्रधानमंत्री ग्रामीण साक्षरता अभियान राबवले आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना सुरक्षितता बाळगणे, इंटरनेटवरील माहितीचा वापर करत असताना माहितीची सत्यता पडताळून पाहणे, नोकरीच्या संधी शोधणे यासाठी डिजिटल साक्षर असणे आवश्यक आहे.
याप्रसंगी अंकलखोप काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. घनश याम (मामा) सूर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटलीकरण होत आहे. अशावेळी इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असताना आपली फसवणूक होऊ शकते. आणि याला सुरक्षितता मिळणे आवश्यक आहे. सरकारने आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असताना पुरेशी सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आणि आभार प्रा. बाबासाहेब कुराडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमकार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी अंकलखोप गावातील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रशांत सूर्यवंशी, अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन श्री. धनंजय सूर्यवंशी, पोलीस पाटील सौ. सुनिता सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, एम. के. चौगुले, शितल बिरनाळे, जयकुमार कोले, अशोक सूर्यवंशी, विजय पाटील, विशाल सूर्यवंशी, राजेंद्र चौगुले, संदीप मिरजकर, हणमंत हजारे, अशोक चौगुले, राहुल पाटील तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment