डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने सुखवाडी येथे श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने सुखवाडी येथे श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या वतीने मु.पो.सुखवाडी ता.पलूस या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे वतीने श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन समारंभ पार पडला. या श्रमदान शिबिराचे आयोजन दि.३० जानेवारी २०२५ ते ०५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमधील नेतृत्व कौशलता विकास करण्याचे उद्देशाने सात दिवस या प्रशिक्षण शिबिर चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस व्ही.पोरे होते. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्री.बाळासाहेब यादव (सरपंच ग्रामपंचायत, सुखवाडी) उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे तसेच कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए एल.जाधव, सौ. अपर्णा मोहिते (सुखवाडी उपसरपंच), सौ.अमृता जगताप (सुखवाडी पोलीस पाटील) आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला जलारपण करण्यात आले. याप्रसंगी श्री.आनंदराव (भाऊ) नलवडे (संचालक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ) यांनी जनसेवेचे आणि समाजसेवेचे ऋण फेडण्यासाठी सुखवाडी गावातील रस्ते बांधण्यासाठी, गावातील विकासासाठी सढळ हाताने मदत केली याबद्दल त्यांचा श्री. भगवान जगताप (तंटामुक्ती, अध्यक्ष सुखवाडी) यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला जातो तसेच आपण एक आहोत अशी एक भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये माणुसकीचे दर्शन घडवता येते तसेच देशाचा विकास हा समाजसेवेतूनच केला जातो. महाविद्यालयातील तरुणांना स्वयंशिस्त लागण्यासाठी श्रमसंस्कार शिबिर ही संस्कार कार्यशाळा असते, त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. भगवान जगताप (तंटामुक्ती, अध्यक्ष सुखवाडी) मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने शिबिरात सहभागी न होता काहीतरी नवीन शिकायला मिळेल हा हेतू असावा. तसेच विद्यार्थ्यांनी कौतुकापेक्षा स्तुतीसाठी श्रमसंस्काराला महत्त्व द्यावे.
यानंतर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री. आनंदराव (भाऊ) नलवडे (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक) मार्गदर्शन करताना म्हणाले की,
आजचा तरूण हा मोबाईलच्या आहारी गेलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि श्रमप्रतिष्ठा अंगी बाणण्यासाठी अशाप्रकारची शिबिरे खूप उपयुक्त ठरतात. स्वावलंबी जीवन कसे जगावे, वेळेचे महत्त्व, समता, बंधुता, वैचारिक दृष्टिकोन यांसारख्या अनेक मूल्यांची शिकवण या ठिकाणी होत असते. म्हणून अशाप्रकारच्या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
भारती सहकारी बॅंक पुणे, संचालक- मा. जितेश (भैय्या) कदम तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा. शंकरराव पाकले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केले आहे.
या कार्यक्रमामध्ये डॉ. दादा नाडे, डॉ.मारुती धनवडे, डॉ.तृषांत लोहार, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. अमोल कुंभार, प्रा.नलेश बहिरम, प्रा.किशोर चौगुले, प्रा. दीपक पवार, प्रा. सुनील साळुंखे, हमीद मुल्ला आदि राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले तसेच या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक,शिबिरार्थी स्वयंसेवक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment