Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय मतदार दिनाच्या विविध स्पर्धांमध्ये यश

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय मतदार दिनाच्या विविध स्पर्धांमध्ये यश


सांगली: मा. भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
       
या कार्यक्रमात सांगली विभागातील महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, वक्तृत्व व घोषवाक्य या स्पर्धेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, न्यायाधीश सचिव जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणचे श्री. गिरीश कांबळे, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मतदान नोंदणी अधिकारी मा. आशिष बारकुल, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (सांगली) श्रीमती अश्विनी वरोटे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातून रांगोळी स्पर्धेमध्ये कु. सुजाता म्हारुगडे, कु. भाग्यश्री कदम तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये गणेश साळुंखे, कु. अमृता भिसे व घोषवाक्य स्पर्धेमध्ये कु. साक्षी आयवळे व श्रेयश भिसे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे विशेष कौतुक केले. 
       
सदर विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी प्राध्यापकांचाही उल्लेख केला गेला. या कार्यक्रमास डॉ. विकास आवळे, ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर, प्रा. वासंती गावडे तसेच प्रशासकीय सेविका सौ.अरुणा सूर्यवंशी इ. नी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)